जळगाव -के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे गांधी रिसर्च फाउंडेशनला क्षेत्र भेट आयोजीत करण्यात आलेली होती.प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.08/10/ 2025 रोजी गांधी जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन येथे या क्षेत्रभेटीच्या समन्वयीका
डॉ.पूनम जमधडे यांनी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक क्षेत्र भेटीमध्ये बी.एड. व एम.एड च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजीं चे विचार आणि कार्य याविषयी ऑडिओ व्हिडिओ क्लिप द्वारे माहिती प्राप्त केली. तसेच महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन मधील गांधीजींचे शैक्षणिक विचार आणि नयी तालीम सारख्या मुलोद्योगी शिक्षणावर भर देणाऱ्या कृतींचे निरीक्षण केले.यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना चौधरीसर,फालासर,कुलकर्णी सर यांनी गांधीजींच्या शैक्षणिक विचारावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी यावेळी सुग्रास भोजनाचा देखील आस्वाद घेतला.महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. केतन चौधरी ,आणि सर्व प्राध्यापक वृंद क्षेत्र भेटीस उपस्थित होते.
