*कंडारी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी. दादा सो अँड. अनिल वसंतराव पाटील यांची बिनविरोध निवड*
कंडारी, तालुका जिल्हा जळगाव येथील चेअरमन बिनविरोध निवडीची प्रक्रिया कायम
येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची गेल्या 40 वर्षांपासून बिनविरोध निवड संचालकांद्वारे केली जात आहे.
आज 12 ऑक्टोंबर रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै. वसंतराव पाटील यांचे चिरंजीव दादा सो अनिल वसंतराव पाटील यांची निवड या पदी पार पडली.
कै. वसंतराव पाटील हे देखील कंडारी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते.
सदरची निवड प्रक्रिया अधिकारी गौतम बलसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आर पी कांबळे (सहाय्यक सहकार अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर निवड प्रक्रिये करिता सूचक म्हणून विलास रामचंद्र सुर्वे तर अनुमोदक म्हणून मधुकर दामोदर सोनवणे यांनी पाठिंबा दिला.
तसेच सचिव पदी हिरालाल भावसार यांनी कार्य पार पाडले .
सदर संस्थेचे संचालक पाटील चंद्रकांत चिमणराव तसेच महाजन यशवंत माधव, सुर्वे विकास रामचंद्र, परदेशी सुनील फकीर सिंग, देशमुख मल्हार शिवाजीराव ,सुर्वे पंडित बाबुराव, सोनवणे मिलिंद नारायण, बाविस्कर पुष्पाबाई पंडित आदि संचालकांनी सदर निवडी बाबत चेअरमन यांचे मनापासून अभिनंदन केले आहे तसेच मित्रपरिवार व कंडारी ग्रामस्थ,ग्राम पं यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे…
