
एकलव्य विद्यालयातील हर्षल गोरखनाथ बिरारे याची धनुर्विद्या- भारतीय या खेळ प्रकारात सलग दुस-या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. हर्षलच्या या निवडीबद्दल प.खा.भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सुहास नटावदकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी त्याचे अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडाशिक्षक सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश वळवी, नितीन पाटील उपस्थित होते.
