Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, September 3
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
बातम्या

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 30, 2026No Comments25 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य
कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे, तसेच अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील गैरसोयींची त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी ऑडिट) पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.
पुणे, नाशिक आणि नागपूर येथील आदिवासी विद्यार्थी गेल्या १७ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुण्यातील कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.
भरती प्रक्रियेलाही गती
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत विभागाचे अधिकारी, आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. बैठकीत बिंदुनामावली आणि पैसा क्षेत्रातील भरती, तसेच आश्रमशाळांमधील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
आतापर्यंत नऊ संवर्गांची भरती पूर्ण झाली असून उर्वरित सहा संवर्गांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अधिसंख्य पदांबाबतही तीन महिन्यांच्या आत संख्या निश्चित करून पुढील सहा महिन्यांत त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य
बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आश्रमशाळांशी संबंधित प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आंदोलनकर्त्यांनी पुणे येथे सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार रोहित पवार यांचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,557

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

By Team YuvaDishaSeptember 3, 20265

“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

August 30, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.