Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, September 4
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल*
बातम्या

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल*

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 8, 2026No Comments23 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

​*स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल*
*जळगाव* : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेऊन वीजचोरी केली. शहरातील अशा​ ३ ग्राहकांवर महावितरणने थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीराम चौकातील प्रतिभा रितेश पवार या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी थकबाकी केली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने घरासमोर असलेल्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी​ केल्याचे आढळले. या ग्राहकाने ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात आशाबाबा कॉलनीतील लक्ष्मी भानुदास बागडे या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीजवापर केला. या ग्राहकाने ३४ हजार रुपयांची वीजचोरी केली. तर शिव कॉलनीतील स्वप्नील प्रशांत सैंदाणे यानेही वीजपुरवठा थकबाकीची खंडित असताना अनधिकृपणे वीजवापर केला. त्याने ३८ हजार ८५० रुपयांची वीजचोरी केली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्या फिर्यादीवरून या ​३ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलाम १३५ अन्वये गुन्हे दाखल ​करण्यात आले.
दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित‍ केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,557

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

By Team YuvaDishaSeptember 3, 202622

“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

August 30, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.