Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, June 4
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा
बातम्या

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

Team YuvaDishaBy Team YuvaDishaMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments18 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.

मुंबई येथील ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या निकोप व सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांसाठी Ease of Living आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी Ease of Working साध्य करण्यावर विशेष भर देण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने खालील सात प्रमुख निकषांवर प्रभावी कामगिरी केली आहे :

  • अद्ययावत व नागरिकांसाठी सुलभ संकेतस्थळ (वेबसाईट)
  • ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी
  • ई-ऑफीस (e-Office) प्रणालीचा १०० टक्के वापर
  • कामकाजाच्या देखरेखीसाठी प्रगत डॅशबोर्ड प्रणाली
  • नागरिकांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर
  • भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा प्रभावी उपयोग

या सर्व निकषांवर आधारित कामगिरीचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी कार्यक्रमात केले.

यावेळी बोलताना श्री. घुगे म्हणाले, “हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. हे यश आम्ही जळगावकर नागरिकांना समर्पित करतो.”

डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून जळगाव जिल्ह्याने प्रशासनात नवा आदर्श निर्माण केला असून, ही कामगिरी जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारी ठरणार आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.