Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, February 28
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»“आय एम आर मध्ये ‘क्रीडा वेध’ महोत्सवाचे आयोजन”
बातम्या

“आय एम आर मध्ये ‘क्रीडा वेध’ महोत्सवाचे आयोजन”

Team YuvaDishaBy Team YuvaDishaJanuary 24, 2026No Comments0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव- के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, येथे २२ जानेवारी २०२६ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान क्रीडावेध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते झाले, उद्घाटन प्रसंगी संचालक प्रा. बी. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक संतुलन राखण्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होतो. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासोबत खेळांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूट च्या क्रीडा संचालक डॉ. नीलिमा पाटील यांनी केले, सूत्र संचालन डॉ. दिपाली पाटील यांनी केले, या प्रसंगी डीन व्यवस्थापन विभाग, डॉ. ममता दहाड तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. या क्रीडा वेध अंतर्गत विविध इनडोअर व आऊटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले. दि. २२ जानेवारी रोजी सकाळी बुद्धिबळ व दुपारी कॅरम स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ जानेवारी रोजी क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी स्पर्धाचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे. दि. २४ जानेवारी रोजी सकाळी टेबल टेनिस, संगीत खुर्ची, रस्सी खेच या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. २५ जानेवारी रोजी फुटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे. या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होत असून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेशही दिला जात आहे. संपूर्ण महाविद्यालय परिसरात क्रीडावेध महोत्सवामुळे उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.