स्वराज्य निर्मितीमागे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची प्रेरणा – सचिन देवरे

*देशमुख महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती संयुक्तपणे साजरी*
अनेक शतकांच्या जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्याचे स्वप्न राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांनी पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर संस्कार केले. शिवरायांनी अठरापगड जातीतील सहकाऱ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. म्हणून खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्मितीमागे माँसाहेब जिजाऊंची प्रेरणा होती, असे प्रतिपादन शिवश्री सचिन देवरे यांनी केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक व जयंती-पुण्यतिथी समिती यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. याप्रसंगी वक्ते म्हणून शिवश्री सचिन देवरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून देण्याचे महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या चरित्र आणि कार्याच्या रूपाने युवकांपुढे आदर्श उभा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले तर प्रा.डॉ. एस .डी. भैसै यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास डॉ. डी .ए. मस्की, प्रा. आर. एम. गजभिये, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, डॉ. बाळाजी पाटील, डॉ. गजानन चौधरी, डॉ. इंदिरा लोखंडे , प्रा.ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. मयूर दायमा व विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते.
