जळगाव : एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय आंतर-महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर बियाणी विधी महाविद्यालय, धुळे उपविजेता ठरले. उत्कृष्ट पुरुष वकील म्हणून एन. टी. व्ही. एस. विधी महाविद्यालय, नंदुरबारचा विद्यार्थी दर्शन नाथाणी तर उत्कृष्ट महिला वकील म्हणून एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची ईशा पिंपळीकर यांची निवड करण्यात आली. बेस्ट मेमोरियलचे पारितोषिक एस. एम. बीयानी विधी महाविद्यालय, धुळे यांना मिळाले.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायालय, जळगावचे न्यायमूर्ती श्री. एम. एम. बडे यांच्या हस्ते झाले. या वेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राजेंद्र नन्नवरे, बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे समन्वयक डॉ. विकास गीते, के. सी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बी. पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी व मूट कोर्ट समन्वयक डॉ. विजेता सिंग हे होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चव्हाण, डॉ. ज्योती भोळे, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. नितीन मटकरी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती श्री. बडे यांनी विद्यार्थी जीवनातील मूट कोर्टचे महत्त्व अधोरेखित करताना न्यायालयीन निवाडे हे कायद्याचे जिवंत स्रोत असल्याचे नमूद केले. अभिरूप न्यायालय स्पर्धा ही न्यायप्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देणारी शिक्षणात्मक प्रक्रिया असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
डॉ. विकास गीते यांनी बौद्धिक संपदा अधिकाराचे महत्त्व स्पष्ट केले. श्री. ननावरे यांनी पर्यावरणीय प्रश्न आणि न्यायालयीन सक्रियता या विषयांवर मनोगत व्यक्त केले, तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश पाटील यांनी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण ॲड. महेश भोकरीकर आणि ॲड. सौरभ मुंदडा यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभात डॉ. भूषण चौधरी, के. सी. ई. सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील आणि सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांच्या हस्ते विजेत्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंजली बोंदर यांनी उद्घाटन समारंभाचे आभार मानले, तर विजेत्यांची घोषणा डॉ. डी. आर. क्षीरसागर यांनी केली.
समारोप प्रसंगी सर्वात शेवटी समन्वयक डॉ. विजेता सिंग यांनी उपस्थित मान्यवर व सहभागी महाविद्यालयांचे आभार मानले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.


