जळगाव : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्वायत्त महाविद्यालयास् प्रतिष्ठित रायसोनी करंडक स्पर्धेच्या प्रथम तालीम फेरीत उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. व 1 ते 4 फेब्रुवारी नागपूर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका सादरीकरणात उत्कृष्ट अभिनय व सादरीकरण करत परीक्षकांची दाद मिळवली. या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रा. यश चौधरी यांनी केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. यश चौधरी व प्रा. रेवती पाटील यांनी प्रभावी नियोजन व मार्गदर्शन केले. या यशाबद्दल के सी ई संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे ,उपाध्यक्ष ,कोषाध्यक्ष ,संचालक, सदस्य मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा राहुलकुमार पटेल,ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील ,आय क्यू ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन डिप्लोमा समन्वयक प्रा. बी. जे. लाठी,,सर्व शाखेचे विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
