जळगाव – मू. जे. महाविद्यालयात युवती सभे अंतर्गत, विद्यार्थिनींचे आयुर्वेदच्या दृष्टीने आरोग्य कसे असावे आणि समतोल राखून आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले व तसेच SOFY SANITARY PAD कंपनीच्या वतीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅम्पल वितरित करून मुलींना त्यांच्या मासिक धर्माचे चक्र मोबाईल अँप द्वारे कसे निरीक्षण करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयच्या परीक्षा नियंत्रक डॉ. लीना ढाके, आहार तज्ज्ञ डॉ. माधुरी कासट आणि युवती सभेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली वाघुळदे आदी उपस्थित होते. सदर व्याखनात मुलींना डॉ. माधुरी कासट यांनी आपल्या मातीत पिकलेले अन्न व त्याचे महत्व पटवून दिले. व तसेच मुलींची रोजची दिनाचाऱ्या कशी असावी यासंदर्भातही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली शर्मा यांनी केले.या कार्यक्रमाकरता सर्व समिती सदस्य प्रा. हेमलता पाटील, डॉ. योगिनी राजपूत, डॉ. कविता पाटील, डॉ. नयना पाटील, प्रा. सोनाली शर्मा, डॉ. प्रतिभा तिवारी, डॉ. लीना भोले आणि हरीश चौधरी यांचे सहकार्य लाभले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
