जळगाव -केसीई सोसायटी संचलित मू. जे. (अधिकार प्रदत्त स्वायत्त)महाविद्यालयातील ड्रीमि आइज् रिसोर्स सेंटर तर्फे व लायन्स क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे यांनी भूषवले. प्रास्ताविकामध्ये प्रा.अक्षय खरात (समन्वयक) ड्रीमि आइज् रिसोर्स सेंटर मधील उपलब्ध सुविधांची, सहाय्यक साधनांची, व इनडोअर गेम्सची सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती लेकुळे यांनी केले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रोहित अग्रवाल (प्रेसिडेंट, लायन्स क्लब) डॉ. गणपत धुमाळे (मणिहार लॉ कॉलेज) Mr. चौबे (डायरेक्टर, लायन्स क्लब), दर्पण पाटील (सेक्रेटरी) व किरण गांधी (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. गणपत धुमाळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःला दिव्यांग न समजता आपल्या स्व ला ओळखून शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक प्रगतीमध्ये योग्य दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्माण करून मार्गक्रम केला पाहिजे याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच लायन्स क्लबच्या मार्फत २० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यक साधनांचे — वायरलेस इमर्जन्सी बेल तसेच विविध स्नॅक्स पॅकेट्स इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग समितीतील डॉ. विजय श्रीनाथ कंची, याांनी आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. समीर पाटील (समन्वयक), डॉ. मनोज पांडे , डॉ. निक्कम ललिता, डॉ. ज्योती लेकुळे, प्रा.संदीप पाडवी, प्रा.अक्षय खरात यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सुलभतेबाबत जागृती व प्रेरणा देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख प्रगतीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
