भडगाव – येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे महात्मा ज्योतीराव फुले पुण्य तिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवंरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी होते प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महा विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार व माजी विध्यार्थीनी गायत्री पाटील होते यावेळी गायत्री पाटील या माजी विद्यार्थीनीने फायदेशीर आर्थिक गुंतवणूक बद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूना मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालय परिवारातर्फे किसान मासिक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनोज पवार यांनी तर सूत्र संचालन प्रा मनीषा बोरसेनी आणि आभार प्रा. दत्तात्रय भोसले यांनी केले.यावेळी प्रा प्रविणा पाटील,प्रा मनीषा बोरसे, प्रा प्रशांत पाटील,तुषार पाटील,प्रा दत्तात्रय भोसले, राहूल सोनवणे,प्रा संदीप बाविस्कर प्रा दिनकर सूर्यवंशी, प्रा मनोज पाटील, श्रीकांत हिरे, तेजस पवार, चेतन पाटील उपस्थित होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
