जळगाव- केसीई सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (स्वायत्त) येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आणि एमएचआरडी इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरअँडडी स्पॉन्सर्ड/सीड ग्रँट प्रपोजल रायटिंग वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांमध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी, तसेच संशोधनासंबंधीच्या महत्वाचा बाबी, संशोधन, नावीन्य आणि उद्योजकता यांचे शैक्षणिक क्षेत्रातील वाढते महत्त्व लक्षात यावे हाच मुख्य उद्देश या कार्यशाळेच होता. या कार्यशाळेत एपेक्स स्टार्टअप ग्रुप, जळगाव चे श्री. अजिंक्य टोटला यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलविण्यात आले, विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना त्यांनी, संशोधन प्रस्ताव कसा लिहावा, त्यातील उद्दिष्ट स्पष्ट कसे करावे, समस्या निवड आणि रिसर्च गॅप ओळखण्याची प्रक्रिया, तसेच प्रस्तावाची रचना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रस्ताव सादरीकरणात बजेटची उभारणी, हेडवाईज खर्च नियोजन, निधीदार संस्थांच्या अपेक्षा, टाइमलाइन तयार करणे आणि आउटकम–इम्पॅक्ट ठळकपणे मांडणे यांचे व्यावहारिक उदाहरणांसह स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांनी संशोधनातून स्टार्टअपकडे जाण्याचा मार्ग, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम सोल्विंग आणि निधी मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित होते, अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, नावीन्य आणि उद्योजकता यांचे शैक्षणिक क्षेत्रातील वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आधुनिक अभ्यासक्रमात संशोधन ही केवळ शैक्षणिक आवश्यकता नसून विद्यार्थ्यांना नवकल्पना, विचारप्रवृत्ती आणि समस्यासोडवणूक क्षमता विकसित करण्यासाठीची अत्यावश्यक प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्ताव लेखन हे भविष्यातील प्रकल्प, स्टार्टअप उपक्रम आणि संस्थात्मक पातळीवरील नाविन्यपूर्ण कामकाजासाठी अत्यंत आवश्यक कौशल्य असल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळेस स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता, डॉ. ममता दहाड, बीबीए विभागप्रमुख डॉ. अनुपमा चौधरी व इतर प्राध्यापक वर्ग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनश्री चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियांका खरारे यांनी तर आभार प्रदर्शन कु. मैथिली नेमाडे यांनी केले, कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
