
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व बोपखेल पुणे येथे झालेल्या पहिल्या 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या संघाने अष्टपैलू कामगिरी केली
त्यामध्ये मानस नितीन चौधरी व हर्षदा माळी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व
भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा सोनीपत येथे होणाऱ्या 35 व्या सब ज्युनिअर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील कु. मानस नितीन चौधरी (जळगाव), कु. हर्षदा सुभाष माळी (पहूर पाळधी) दोन खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, चोपडा येथील आ.चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक अमितभाऊ काळे, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, राधेश्याम कोगटा, चंद्रकांत शेठ लोढाया, नितीन बरyडे, ॲड, रोहन बाहेती, सुनील राणे, अलेक्झांडर मनी, नयन सागर मानी, संजय संसारे, हितेश सोनी,अरुण गावंडे, हरिश शेळके यांनी अभिनंदन केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
