जळगाव – के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत इलेकट्रॉनिकस अँड कॉम्पुटर विभागातर्फे द्वितीय ते अंतिम वर्ष शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम्बइडेड स्टार्ट अप वर व्याख्यानाचे आयोजन केले होते . एकरुक्सबॉट प्रा. ली कंपनीचे संस्थापक श्री हितेंद्र वाल्हे आणि श्री भाग्येश ताजणे यांनी विद्यार्थ्यांना एम्बेडेड तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व, आयओटी आधारित स्टार्टअप्सची संधी, आणि हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंटिग्रेशनचे व्यवसायिक उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. स्टार्टअप सुरू करताना येणाऱ्या प्रमुख अडचणी—जसे की प्रोटोटायपिंग खर्च, योग्य सेन्सर/मायक्रोकंट्रोलर निवड, फर्मवेअर डेव्हलपमेंट, आणि ग्राहकांच्या गरजेनुसार प्रॉडक्ट डिझाईन—यावरही प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा स्नेहा पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . या प्रसंगी डीन ऑफ अकॅडमिक प्रा राहुलकुमार पटेल ,आय क्यू ए सी समन्वयक प्रा कल्पेश् महाजन , विभाग प्रमुख प्रा .वैशाली सरोदे यांची उपस्थिती होती .
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
