
आगामी पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जोरदार हालचाल सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह विविध प्रभागांतील उमेदवारांनी नियोजनबद्ध तयारीला सुरूवात केली असून पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी, शनिवार सकाळी ९ वाजता धम्मदय बौध्दविहारातून प्रस्थान करून उमेदवारांचा भव्य रॅलीसह अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच समाजातील सर्व स्तरातील मित्र परीवार मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक ७ “अ” मधून नगरसेवक पदासाठी सौ. वर्षा प्रविण ब्राह्मणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यांचा प्रचार चिन्ह धनुष्यबाण असल्याचेही जाहीर करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली आहे.
मतदान दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून, मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पाचोऱ्यातील नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी काही दिवसांत निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
