जळगाव –
मू.जे.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांची महर्षि दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती निमित्त तसेच आर्य समाज स्थापनेच्या 150 व्या गौरव वर्षानिमित्त दिल्ली येथे होणा-या सार्द्ध आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात दि. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 यादरम्यान वैदिक गुरुकुलीय शास्त्रीय प्रतिस्पर्धांचे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय महासंमेलनाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे महासंमेलनाचे पदाधिकारी स्वामी प्रणवानंद सरस्वती, आचार्य डॉ. धनंजय व धर्मपाल आर्य यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. भूपेंद्र केसूर, संस्कृत विभाग प्रमुख प्रो. भाग्यश्री भलवतकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
