Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणे जळगाव जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
बातम्या

हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणे जळगाव जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 28, 2025No Comments92 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 जळगाव, दिनांक 28 ऑक्टोंबर – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत. ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता आहे. नागरिकांना विनंती करण्यात येते की, अशा उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघडू किंवा हलवू नयेत. उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते. काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो, त्यामुळे त्यांना हाताळू नये. अशा वस्तू आढळल्यास जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, अथवा खालील पत्त्यावर फोन किंवा संदेश पाठवावा, संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद. उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व झालेला खर्च परत दिला जाईल. मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही. स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी व स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे, पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद यांनी कळविले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 2026110

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.