Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

August 25, 2026

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, August 27
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 25, 2026No Comments28 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

 

जळगाव, दि. २५ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या वर्षासाठी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

 

सन २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यापूर्वी ही योजना जिल्हास्तरावर लागू होती. शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४ अन्वये ती तालुकास्तरावरही लागू करण्यात आली आहे.

 

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळाल्याने निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेता न येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी ठराविक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

 

मागील वर्षातील स्वाधार योजनेचे विद्यमान विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर लॉगिन करून सन २०२६-२७ या वर्षासाठी आपले ऑनलाइन अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अद्ययावत करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026

आदिवासी विकास कर्मचारी संघटनेची नाशिक विभागातील प्रकल्पस्तरीय कार्यकारणी जाहीर

August 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,555

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By Team YuvaDishaAugust 25, 202628

*सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन* जळगाव, दि. २५ (जिमाका) : सामाजिक…

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026

आदिवासी विकास कर्मचारी संघटनेची नाशिक विभागातील प्रकल्पस्तरीय कार्यकारणी जाहीर

August 21, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.