Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

August 25, 2026

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, August 28
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
बातम्या

विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 19, 2026No Comments23 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
नंदुरबार | प्रतिनिधी
‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत क्रीडा निपुणता केंद्र (बालवाडी), पुणे येथे होणाऱ्या विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार येथील सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या निवड चाचणीत या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली.
निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये खुशी सुकलाल पावरा (इयत्ता १० वी), विन्ता गिरीश वसावे (इयत्ता ९ वी), परिधी राजेंद्र अहिरे (इयत्ता ९ वी), प्रीती विश्वास वळवी (इयत्ता ८ वी), सुप्रिया इंदाराम गावित (इयत्ता ८ वी) आणि अर्चना राजमल खर्डे (इयत्ता ८ वी) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत या विद्यार्थिनींनी आपल्या हॉकी कौशल्याची चमक दाखवत विभागीय स्तरावर निवड मिळवली. पुढील शिक्षण व क्रीडा प्रशिक्षणासाठी त्या पुणे येथे जाणार आहेत. त्यांच्या या यशामुळे शाळेसह नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे नाव उंचावले आहे.
या उल्लेखनीय निवडीबद्दल नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, भानुदास वसावे, देवेंद्र पाटील, योगेश बागल, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, विजय सोनार, रवींद्र निकम तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या ज्योती निरभवणे आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
विद्यार्थिनींच्या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य व जिद्द यांसोबतच हॉकी प्रशिक्षक भगवान पवार व योगेश कुंभार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. सहा विद्यार्थिनींच्या निवडीमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

August 25, 2026

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,555

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By Team YuvaDishaAugust 25, 202629

*सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन* जळगाव, दि. २५ (जिमाका) : सामाजिक…

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

August 25, 2026

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026

आदिवासी विकास कर्मचारी संघटनेची नाशिक विभागातील प्रकल्पस्तरीय कार्यकारणी जाहीर

August 21, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.