*
दि. 17 ऑगस्ट 2026
येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात पालक- शिक्षक सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालक- शिक्षक संघाच्या सचिव प्रा. शितल चौधरी यांनी मागील वर्षाचे इतिवृत्ताचे वाचन करून प्रास्ताविक सादर केले.
त्यानंतर पीएनजी ज्वेलर्स, जळगाव यांचेकडून उपस्थित पालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी पीएनजी ज्वेलर्स जळगाव चे सुपरवायझर श्री.महेश हडप व त्यांचे सहकारी अनुक्रमे माया सरोदे ,पूनम कोळी व पूजा पाटील उपस्थित होते.
त्यानंतर वर्गनिहाय पालक प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे वंदना मनोहर चव्हाण, सुरेखा नितेश सपकाळे, समा आमीरुल हसन अन्सारी, कांचन संजय चौधरी, सोनाली नितीन महाजन, दिनेश मधुकर मोरे, अनिता अनिल बोरसे, रेखा जगन्नाथ श्रीखंडे, संदीप नारायण चौधरी, रजिया मुस्ताक तडवी, पल्लवी सिद्धार्थ भालेराव, प्रतिभा वाल्मीक मोरे, वृषाली महाजन व शारदा बबलू दुबे यांची निवड करण्यात आली. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. मिलिंद पुंडलिक पाटील यांची तर श्री. जितेंद्र भिका भोई यांची उपसचिव पदी निवड करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या पालक प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला व निवडक पालक प्रतिनिधींनी आपले विचार सभे पुढे मांडले.
आई-वडिलांनी आपल्या पाल्यांशी रोज एकदा तरी संवाद साधावा, त्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्यास स्वातंत्र्य द्यावे, युग स्पर्धा परीक्षांचे आहे ,नीट व जेईई यासारख्या परीक्षांसह इतर स्पर्धात्मक परीक्षांची आपल्या पाल्यांना तयारी करायला सांगावे ,असा मोलाचा सल्ला माननीय प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी आपल्या मनोगतात पालकांना दिला. यावेळी व्यासपीठावर पालक- शिक्षक संघाच्या सचिव प्रा. शितल चौधरी ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. एन. जी .बावस्कर तसेच किमान कौशल्य विभागाचे समन्वयक प्रा. के .सी. वंजारी उपस्थित होते
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुनम नारखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुजाता महाजन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
