प्रतिनिधी | जामनेर
जामनेर बस स्थानकातून जीपीएस ट्रॅकर असलेल्या अत्याधुनिक जिजाऊ बसची चोरी झाली. सोमवारी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे जामनेर आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
एम.एच. १४ एन.ई. ४२१४ ही शटल बस रात्री साडेनऊ वाजे दरम्यान जळगाव येथून जामनेर बस स्थानकात दाखल झाली. अखेरची फेरी असल्याने चालकाने बस फलाट क्रमांक दोनवर लावून ठेवली. चावी बसलाच असल्याचे हेरून चोरट्याने रात्रभर बस स्थानकातच मुक्काम केला. पहाटे अडीच वाजे दरम्यान चोरट्याने स्थानकातून गाडी पडविल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. ही बस टाकळी, कोदोली मार्गे शहापूरला येत असताना शहापूर जवळ समोरचे टायर फुटल्याने चोरट्याने बस सोडून पलायन केले. यामुळे मात्र जामनेर आगाराची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली असून आगाराच्या गलथान कारभाराकडे लक्ष दिले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
……….
बस पोर्टचे काम अपूर्ण
एअरपोर्टच्या धरतीवर सोयीसुविधा असतील असे पासपोर्ट उभारणीसाठी म्हणजे गिरीश महाजन यांनी विशेष प्रयत्न करून १४ कोटी रुपये मंजूर करून घेतले. मात्र गेल्या सात वर्षांपासून बस्पोर्टचे काम अपूर्ण पडलेले आहे. गेल्या काही काळात चोऱ्या वाढल्याच्या तक्रारी पाहता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मात्र त्यानंतर ही चोरी झाल्याने वाचमन काय करीत होता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
