*माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*जळगाव, दि. 5 (जिमाका):* जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा तसेच पाल्यांना सूचित करण्यात येते की, विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी देश व राज्याची तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढविणारे लक्षणीय कार्य केल्याबद्दल “विशेष गौरव पुरस्कार” देण्यात येणार आहे.
तसेच इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के व इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांनाही सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या मार्फत विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी या संधीचा लाभ घेऊन दि. १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
