शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन....
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य शाखा जळगाव जिल्ह्याच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दि.१२ ऑक्टोबर पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
१) कंत्राटी पद्धतीने भरती रद्द करण्यात येऊन तात्काळ सरळसेवेने पदभरती करण्यात यावी.
२)पदभरतीतील ८०:२० ची अन्यायकारक अट रद्द करावी.
३)सर्व पात्र कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी.
४)CNE रजिस्ट्रेशन ची सक्तीची अट रद्द करण्यात यावी.
५)९००० रु.नर्सिंग भत्ता तात्काळ लागु करण्यात यावा.
६) परिचर्या संवर्गातील सर्व पदनामे केंद्र सरकारच्या धर्तीवर सुधारित करुन अद्ययावत करण्यात यावी.
७) राज्यस्तरीय सेवाजेष्ठता यादी तयार करून सेवा जेष्ठ कर्मचाऱ्यांना प्रथम संधी द्यावी.
या मागण्यांसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रुग्णालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शीला पटोकार(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी संघ),दिपक बोरसे(जळगाव जिल्हा सचिव राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) यांनी केले.
या आंदोलनात रोहित कोळी,महेश्वर घुलेश्वर,कल्पना बच्छाव,जयश्री वानखेडे,निकिता गवई,आंचल शेख,संकिता जाधव,मोनाली कदम,केतकी कुंभार,विशाल सोळंकी,शिवराज गायकवाड,अनिल वळवी,सुरज अहिरराव,सोमेश निकम,अनिल भोई,धीरज मुंढे,परवेज शेख,तेजस्विनी जाधव,गणेश वायाळ,सौरभ शिंदे यांनी सहभाग नोंदवला.
जनतेचाही पाठिंबा
या आंदोलनाला सुमित्र अहिरे (राज्य प्रभारी आंदोलन निर्माण समिती),दिलीप जाधव(तालुका अध्यक्ष बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क), रविंद्र मोरे (तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),कैलास मसाने(तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी पेन्शनर संघ) यांनी सक्रिय पाठिंबा दिला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
