पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न
शहादा : शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी व को-ऑप. एज्युकेशनल सोसायटी संचालित विकास विद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने उपक्रम राबवण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाकुंभरोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत उमेदवारांसाठी रोजगार अभिमुखता व रोजगारपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला IMRD महावियाला, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय,वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विविध क्षेत्रातील ६ नामांकित कंपन्यांनी रोजगाराच्या संधींसाठी सहभाग नोंदविला.त्यात प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या १२५ असून नियुक्तीपत्र दिलेल्या उमेदवारांची संख्या २९ होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण जे .पाटील होते. यावेळी विकास कॉलेजच्या प्राचार्या.सुरेखा आय.पाटील, उपप्राचार्य.मानव उपगडे,श्री.एच.एम.पाटील, श्री. ए.आर.पाटील ,श्री.राठोड सर श्री.एस.आर.बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य
श्री. व्ही.एस.मराठे, श्री .एस. ए.पाटील यांनी स्थान स्वीकारले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तथा प्रास्ताविक श्री.एम.पी.चौधरी यांनी केले.
महाकुंभात सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना उपलब्ध रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये, पात्रता व निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधून विविध रोजगार संधींची माहिती घेतली.श्री.एस. आर.बागुल,श्री. एच. ए. मोरे,श्री.एस.आर.पाटील,श्री. वाय. ए.पाटील कु. एन. जी.तावडे,श्री. एम. व्हि.जाधव यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विकास महाविद्यालयातील प्रा.वाय.एस.साळवे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
