महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त नंदुरबारात स्वच्छता मोहीम
नंदुरबार, दि. २ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासह विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. चंद्रकांत पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर प्रकल्प कार्यालय तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि कामाचा भाग असायला हवी. आपल्या स्वभावातील स्वच्छ भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी श्री. देवेंद्र पाटील, श्री. योगेश बागल, लेखाधिकारी श्री. सुदर्शन पावरा, नियोजन अधिकारी श्री. देवरे, कार्यालय अधीक्षिका श्रीमती वैशाली पाटील तसेच विस्तार अधिकारी श्री. डी. एन. माळी यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम व अभिवादन कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
