शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर व कै . सौ. जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले यात 19 वर्षे वयोगटात खुशी पटेल व कावेरी बिरारी या दोघी विद्यार्थिनींची जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच 17 वर्षे वयोगटातून विद्यार्थिनींमध्ये खुशी सूर्यवंशी, पियुशा पटेल,दिया कोते तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशाल पवार या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
11 सप्टेंबर 2026 रोजी चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आयोजित 19 वर्ष वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत शेठ व्ही.के.शहा विद्यामंदिर व कै. सौ.जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथील विद्यार्थ्यांनी उपविजेता पदाचा मान मिळवत जिल्हास्तरावर प्रवेश मिळविला तसेच 17 वर्षे वयोगटात शेठ व्ही.के. शाह विद्या मंदिर शहादा येथील विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर प्रवेश मिळविला
चोपडा येथे पार पडलेल्या 5 किमी मॅरेथॉन स्पर्धेत चिन्मय भागवत वाघ इयत्ता दहावी H या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला…
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्यासाहेब तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हिरालालभाई पटेल,सचिव श्री ए.के.पाटील, संस्थेचे संचालक माननीय दादासो अभिजीत पाटील, तज्ञ संचालक श्री एस. पी. पाटील सर संकुलाच्या प्राचार्य आदरणीय सुरेखा पाटील मॅडम, उपप्रचार्य श्री मानव पगडे, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. जाधव, पर्यवेक्षक श्री. भालचंद्र चौधरी, श्री. विपिन चौधरी, श्री. विलास जावरे तसेच संस्थेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी सर्व क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण व मोलाचे सहकार्य लाभले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
