महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटनेतर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी आज आठ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन जळगाव येथे साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सौ सीमाताई भोळे. नगरसेवक विष्णूभाऊ भंगाळे ,नगरसेवक हर्षलभाऊ मावळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ सूर्यवंशी अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख देविदासभाऊ फुलपगारे शहर संघटनेचे अध्यक्ष महारु इसे हे होते. सदर कार्यक्रम प्रसंगी श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटनेत स्थापनेपासून विशेष योगदान देणारे 31 ज्येष्ठ समाजसेवक यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. संत सेना महाराजांवर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने श्री विष्णूभाऊ भगाळे तसेच श्री किशोरभाऊ सूर्यवंशी देविदासभाऊ फुलपगारे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे या सर्वांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी,राजकुमार महाले ,अनिल निकम, मनीष कुवर ,माजी नगरसेवक पृथ्वीराजभाऊ सोनवणे, संजय चित्ते ,पद्माकर निकम, अनिलअण्णा सूर्यवंशी, विजय खोडे , राजकुमार गवळी, सुदाम कोरडे,अरुण निकम ,नितीन खोंडे,अशोक वसाने, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील जगताप. प्रशांत कुवर, श्याम फुलपगारे, बापू सोनगिरे, अरुण वसाने, छगन सूर्यवंशी, संतोष खोंडे, शांताराम खोंडे,अनिल वेडीस्कर, एड. प्रवीण चित्ते, मधुकर निकम, विजय ठाकरे, सुभाष कुमार किरणभाऊ सोनवणे, तसेच सर्व समाज बांधवांनी व महिला कार्यक्रम यशस्वीतेसाठीअथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन खोंडे प्रास्ताविक अनिल निकम व आभार प्रदर्शन मनीष कुवर यांनी केले शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
