*स्वाधार योजनेच्या नुतणीकरण अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत ; अर्ज करण्याचे आवाहन*
*जळगाव, दि. १८ (जिमाका) :* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२५-२६ या वर्षात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज नुतणीकरण (RENEW) करण्यासाठी दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी नुतणीकरण अर्ज सादर करताना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपला नुतणीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्यास संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहीत वेळेत आपले नुतणीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
