यावलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान’ कार्यक्रम
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांचा सांस्कृतिक सोहळा
यावल | प्रतिनिधी
सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लोकेश नगर, तडवी कॉलनी, यावल, जि. जळगाव येथे हा कार्यक्रम होणार असून यावेळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व वाद्यांचे सादरीकरण तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोलभाऊ हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते होणार असून यावल नगरपालिकेचे नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पारंपरिक कला, संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासोबतच समाजबांधवांमध्ये एकोपा आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावल परिसरातील आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
