महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदूभाऊ खरे यांची नियुक्ती
निर्भीड, निःपक्ष आणि लोकहिताची भूमिका सातत्याने मांडणारे ज्येष्ठ पत्रकार चंदूभाऊ खरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगच्या खान्देश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
TNP न्यूज सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून चंदूभाऊ खरे यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली आहे. गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, भ्रष्टाचाराविरोधात निर्भीडपणे आवाज उठविल्यामुळे त्यांनी जळगाव जिल्ह्यात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी, राज्याध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्या सूचनेनुसार त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून चंदूभाऊ खरे पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात संघटित लढा उभारतील तसेच पत्रकारांची एकजूट आणि संघटन वाढीसाठी मोलाचे योगदान देतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर चंदूभाऊ खरे यांनी संघटनेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी, सामाजिक बांधिलकी जपत आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
