प्रतिनिधी |
प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात नुकताच
या मेळाव्यात २०११-१२ पासूनचे सुमारे १८० माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ प्रा. सौ. ललिताताई वाणी, संचालक श्री. वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती शालिनीताई भंगाळे, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, श्री. नीलेश नाईक व सौ. ज्योती बिऱ्हाडे उपस्थित होते. तसेच शाळेतील माजी शिक्षकांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
मेळाव्याची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनाचा अनुभव देण्यासाठी त्यांना वर्गात बसवून विविध विषयांचे प्रतीकात्मक अध्यापन करण्यात आले. डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आले. यामुळे उपस्थितांमध्ये आठवणींचा भावनिक माहोल निर्माण झाला.
माजी विद्यार्थी संघातर्फे सर्व माजी शिक्षकांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे रोख २५,००० रुपये शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले. या योगदानामुळे शाळेच्या विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.
या प्रसंगी जोनू जांगीड, अश्विनी निकम व कुंदन पवार यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून प्रेरणादायी विचार मांडले. माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन सौ. सुवर्णा पोतदार यांनी केले. इयत्ता ९ वीतील दिशा मोरे व पल्लवी भालेराव यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
