भडगावला पद्मश्री चैत्राम पवार यांना उद्या होणार महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार वितरण
जलसंधारण व वनसंधारण क्षेत्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चैत्राम पवार यांना उद्या दि. 26 रोजी भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव व पारितोषिक वितरण समारंभामध्ये चैत्राम पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना संबोधित करतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. डी. ए. मस्की व प्रसार माध्यम प्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी दिली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
