प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लालमाती आश्रमशाळेची यशाची परंपरा कायम
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा डॉ हेडगेवार नगर ता. धरणगाव जिल्हा जळगाव येथे दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे बक्षीस वितरण यावल प्रकल्पअधिकारी अरुण पवार साहेब यांच्या शुभहस्ते झाले.या प्रसंगी त्यांनी जाहीर केले की या विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या स्पर्धकांना मागील वर्षाप्रमाणे यावेळी इस्रो (ISRO) बंगळुरू दौऱ्यावर विमान प्रवासाने नेले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याना प्रेरणा मिळेल व त्यांना अवकाश संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. *भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाच्या अनुषंगाने झालेल्या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांनी सहभाग नोंदविला.या प्रदर्शनामध्ये सहभागी मॉडेलचे परीक्षण करण्याची जबाबदारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन कार्य सादर केलेल्या परीक्षकांनी पार पाडली.
यामध्ये उच्चप्राथमिक गटामधून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती च्या *सि- सॉ वापरून विद्युत निर्मिती या मॉडेल ला प्रथम क्रमांक मिळाला. या मॉडेलच्या साहाय्याने सि- सॉ वापरून खेळता खेळता विद्युत निर्मिती होणार आहे, जेणेकरून शाळा, हॉस्पिटल येथील परसबाग व बागेला पाणी देता येणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा लालमाती शाळेने प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले होते, ती यशाची परंपरा यावर्षी सुद्धा त्यांनी कायम राखली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री मनेश तडवी सर व पदवीधर शिक्षक सचिन शिंदे सर यांच्या मार्गदर्शनात सदर प्रकल्पाचे सादरीकरण अश्विन सुनील बारेला व नितीन नवलसिंग पावरा (इयत्ता सातवी)या विद्यार्थ्यांनी केले.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक ठाकरे सर,पाटील सर,नारखेडे सर,पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना सदर मॉडेल तयार करण्यासाठी प्रेरणा दिली.
सदर मॉडेल तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षक इकबाल तडवी व आशिष पाटील यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांच्या व यावल प्रकल्पाचे माननीय प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या यशाबद्दल प्रकल्प कार्यालय यावलचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. पी. माहुरे,पवन पाटील, मिनाक्षी सुलताने,संदीप पाटील, तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेंद्र मुसळे, विश्वास गायकवाड, मिलींद पाईकराव, एल.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज ठाकरे यांनी केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
