जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ – पुरुष उमेदवारांची चाचणी संपन्न; उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी सुरू.
जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील १७१ पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी दि. ११/०२/२०२६ पासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतील २०/०२/२०२६ रोजीच्या पुरुष उमेदवारांच्या चाचणीचा सविस्तर अहवाल खालीलप्रमाणे आहे:
आजच्या चाचणीसाठी एकूण १४१६ पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ८१२ उमेदवार हजर झाले. हजर उमेदवारांपैकी ६० उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर ४३५ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र राहिलेत. सर्व चाचण्यांनंतर एकूण ३१७ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत.
विशेष म्हणजे, आज पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचा शेवटचा दिवस होता. जे उमेदवार यापूर्वी काही अपरिहार्य किंवा वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते, त्यांना आज विनंतीवरून विशेष संधी देण्यात आली होती.
महत्त्वाची सूचना:
उद्या दिनांक २१/०२/२०२६ आणि परवा दिनांक २२/०२/२०२६ असे सलग दोन दिवस महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित महिला उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
