जळगाव – मू . जे.(स्वायत्त ) महाविद्यालय, जळगाव येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, बोरेखेडा – वंजारी खापट, ता. धरणगाव, जिल्हा जळगाव येथील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अणूची रचना, आम्ले, क्षार व मीठ तसेच त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग या विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले व चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या विज्ञान उपक्रमाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन रसायनशास्त्र विभागातील डॉ. जयश्री भिरुड, डॉ. मनोज पांडे, डॉ. वसीम शेख, डॉ. राहुल महिरे, प्रा. सोनल उपलपवार आणि डॉ. रविंद्र पाटील यांनी केले.या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिका गोविंदा पाटील तसेच शिक्षकवृंद सौ. माधुरी अहिरे, श्री. प्रभाकर पाटील, श्री. सुधाकर पाटील, श्री. किरण पाटील व श्री. संदेश शिरसाठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारा व प्रेरणादायी ठरला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
