जळगाव- मू.जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कु. केतकी भरत शिंपी हिची
साठी दोन टप्प्यांच्या कठीण निवड प्रक्रियेतून अंतिम निवड झाली आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. केतकीने कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ, जळगाव, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर ,पश्चिम विभाग गुजरात,या ठिकाणच्या निवड प्रक्रियेतून ती दिल्ली येथील कर्तव्य पथावर जात आहे. तिच्या मेहनतीला, व शिस्तीला मिळालेला हा मान आम्हा सर्व मूल्जीयन साठी अभिमानाचा क्षण आहे. या यासाठी केसीई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, शैक्षणिक संचालिका प्रा.मृणालिनी फडणवीस, प्राचार्य स.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, डॉ. सुरेखा पालवे , डॉ.मनोज चोपडा सोबतच तिला मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा आणि डॉ. जयश्री भारुड मॅडम यांनीही तिचं मनःपूर्वक अभिनंदन केले. व तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
