
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये असलेल्या अनन्यसाधारण योगदानाविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनील शेलार, प्रा. एस. एम. झाल्टे, इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. गजानन चौधरी, प्रा. प्रवीण देसले, सुनील पाटील, संदीप केदार, दिलीप तडवी, अजय देशमुख उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
