जळगाव –
थोर साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून दिवंगत प्राचार्य डॉ. प्र.श्रा.चौधरींचे शैक्षणिक व वाड्मयीन कार्य हे आजही युवा पिढीला प्रेरणा देणारे आहेत. चौधरी सरांनी आयुष्यभर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि समाजातील तळागाळातील माणसांना नेहमीच प्रोत्साहन दिले,सामाजिक बांधिलकी जोपासणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते,असे प्रतिपादन डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी केले. ते केसीई सोसायटीच्या व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्र.श्रा.चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रा.गोपीचंद धनगर संपादित सहवास (प्र.श्रा.चौधरी-शब्दांचे क्षितिज, विचारांची पहाट) या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभात चौधरी, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.साहेबराव भुकन, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा.गोपीचंद धनगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्र.श्रा.चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रभात चौधरी यांनी आपल्या भाषणातून प्र.श्रा. चौधरी यांच्या सहवासातील व व्यक्तिमत्वातील अनेक पैलू उलगडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी प्र.श्रा.चौधरी यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याला उजाळा दिला. तत्पूर्वी सहवास पुस्तकात लेख लिहिणारे लिलाधर कोल्हे, चंद्रकांत भंडारी, प्रा.बी.पी सावखेडकर, रवींद्र मोराणकर, प्रभाकर शेळके (फागणे), रवींद्र पांढरे (पहुर), अशोक पारधे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ए.के नारखेडे, बाळकृष्ण सरोदे, डॉ.योगेश महाले, प्रा.योगेश अत्तरकर, डॉ.विशाल देशमुख, डॉ.नितीन चौधरी, के.ओ.पाटील (नाशिक), वसंत गवई, प्रा.संध्या महाजन तसेच ए.टी.झांबरे विद्यालयातील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू -भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना सोनवणे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी मानले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
