जळगाव – मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई सोसायटी) आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “
” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्यांच्या हस्ते मृदा आणि पाणी तपासणी कोर्स पूर्ण केलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या विद्यर्थ्याना सन्मानित करण्यात येईल.यावेळी श्री. कुरबान एम. तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) ,श्री. अभिनव के. माळी (जिल्हा मृदा तपासणी आणि मृदा सर्वेक्षण अधिकारी) ,डॉ. हेमंत बाहेती ( मुख्य शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र) उपस्थित राहतील.कार्यक्रमाचे स्थळ जुना कॉन्फरन्स हॉल, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव.असे डॉ. मृणालिनी फडणवीस, शैक्षणिक संचालक, केसीई सोसायटी यांनी ही माहिती कळविली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
