jalgaon
-के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयात संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते कार्यक्रमाचे सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार व घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . त्यांनी संविधान हे भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे आपले कर्तव्य ,हक्क, अधिकार या विषयीची माहिती यात मिळते असे सांगितले . तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मुंबई इथे २६/११ ला दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सर्व उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले .या प्रसंगी अकॅडमिक डीन् प्रा राहुलकुमार पटेल,ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील,आय क्यू ए सी समन्वयक प्रा कल्पेश महाजन , डिप्लोमा विभागाचे समन्वयक प्रा बी जे लाठी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
