


केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्वायत्त महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागातर्फे ‘ अल गो रिदम ‘3.0’ फ्रेशर्स पार्टी उत्साहात आणि भव्यदिव्य वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी आय क्यू ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन, अकॅडमिक डीन प्रा. राहुलकुमार पटेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, डिप्लोमा समन्वयक प्रा. बी. जे. लाठी, तसेच इंजिनिअरिंग विभागांचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. या भव्य फ्रेशर्स पार्टीचे आयोजन मुख्य समन्वयक प्रा. रेवती पाटील आणि प्रा. सचिन नाथ यांनी केले. सह-समन्वयक म्हणून प्रा. श्वेता चौधरी, प्रा. प्रिया पाटील, प्रा. गीता पाटील, प्रा. मेघना पाटील यांनी उत्कृष्टपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या तसेच सर्व प्राध्यापकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पडल्यात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सहकार्य केले. फ्रेशर्स पार्टीत विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात नृत्य ,गायन, रॅम्प वॉक, फॅशन शो यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांना बेस्ट ड्रेस, बेस्ट कपल, बेस्ट वॉक, बेस्ट सिंगिंग, बेस्ट ग्रुप डान्स, बेस्ट सोलो डान्स तसेच विज्ञान प्रदर्शनाचे विजेते व इतर अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सूत्रसंचालन करून वातावरण रंगतदार बनवले. या वर्षीचे विजेते— मिस्टर फ्रेशर्स – सिद्धांत नन्नवरे मिस फ्रेशर्स – गौरी खर्चे कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत फ्रेशर्सना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
