जळगाव-के.सी.ई .सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वप्रथम संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त अनमोल असे मार्गदर्शन केले. शाळेने तयार केलेल्या सेल्फी पॉईंट वर विद्यार्थ्यांनी सुंदर असे सेल्फी काढले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील, भावना धांडे, चारूलता भारंबे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कसे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
