Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, April 17
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात
बातम्या

जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 25, 2025No Comments80 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि.२६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशन बदरखे ता पाचोरा चे पालखी, दि. २७ नोव्हेंबरला खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळा, ता.पाचोरा यांचे जुगाड द गोळायुग, दि. २८ नोव्हेंबरला कै.अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगावचे येसूबाई, दि. २९ नोव्हेंबरला जननायक थिएटर्स, जळगावचे गुंता, दि.३० नोव्हेंबरला नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचे घर केलंय, दि. १ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था लि. दीपनगर यांचे तांडा ऊसतोडीचा, दि. २ डिसेंबरला नाट्यभारती इंदूर यांचे काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक, दि. ३ डिसेंबरला लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, नाशिक विभाग, शाखा धुळे यांचे ऐश्वर्या ब्यूटी पार्लर, दि. ४ डिसेंबरला नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे मारुतीची जत्रा, दि. ५ डिसेंबरला रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांचे पुन्हा एकदा, दि. ६ डिसेंबरला समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे, ता.एरंडोल, जि.जळगाव यांचे झेंडा रोविला, दि. ७ डिसेंबरला सिध्दांत बहुउद्देशीय संस्था, धुळे यांचे बिफोर द ट्रेन लिव्हज्‌, दि. ८ डिसेंबरला स्व.यमुनाबाई बाबूराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव बु।।, ता.पाचोरा यांचे आवर्त, दि. ९ डिसेंबरला विश्वात्मा प्रतिष्ठान यांचे आगंतुक ही नाटके सादर करण्यात येणार आहेत.
जळगांव जिल्ह्यासह धुळे व इंदूर येथील नाट्यसंघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित देवून, हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 202683

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.