जळगाव-क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,जिल्हा परिषद नाशिक, नाशिक कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान नाशिक येथे करण्यात आले होते यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील शालेय विभागीय स्तरीय कराटे स्पर्धेमध्ये रोहित ब्राह्मणकर याने सुवर्ण पदक पटकविले शालेय राज्यस्तर कराटे स्पर्धेसाठी निवड झाली शालेय राज्यस्तर स्पर्धा बारामती 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे मार्गदर्शन या खेळाडूंना क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील , यांचे मार्गदर्शन लाभले. अभिनंदन विजेत्या खेळाडूचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे,समन्वयक प्रा.श्री.उमेश पाटील, जिमखाना समिती प्रमुख प्रा.सौ.शोभना कावळे यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
