Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, June 5
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»बालदिनानिमित्त रेडिओ मनभावनचा अनोखा उपक्रम : ज्युनिअर आरजेनी घेतला रेडिओचा चार्ज
बातम्या

बालदिनानिमित्त रेडिओ मनभावनचा अनोखा उपक्रम : ज्युनिअर आरजेनी घेतला रेडिओचा चार्ज

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 17, 2025Updated:November 18, 2025No Comments26 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

जळगाव : १४ नोव्हेंबर – बालदिन २०२५ निमित्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम तर्फे यंदा मुलांसाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण दिवस रेडिओचे संचालन, कार्यक्रमांचे नियोजन आणि सादरीकरणाची सूत्रे लहान मुलांना सोपविण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने रेडिओवरची धावपळ, ऊर्जा, उत्साह आणि निर्मिती लहानग्यांच्या आवाजातून अनुभवायला मिळाली.

दिवसभराचे हे विशेष प्रसारण संभाळण्याची जबाबदारी ज्युनिअर आरजे स्वरा आणि ज्युनिअर आरजे विभूती यांनी उत्तमरित्या पार पाडली. दोन्ही आरजेनी विविध शो, मुलांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम, मनोरंजक संवाद, स्टोरी सेगमेंट्स, पझल्स, क्विझ तसेच चिल्ड्रन्स डे स्पेशल विषयांवर भरगच्च सादरीकरण केले. दोघींची बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि सहजता श्रोत्यांच्या विशेष लक्षात राहिली.

ज्युनिअर आरजे स्वराची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची विशेष मुलाखत

दिवसातील प्रमुख आकर्षण ठरली ज्युनिअर आरजे स्वरा हिने घेतलेली जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची प्रेरणादायी मुलाखत.
या मुलाखतीदरम्यान स्वरा हिने बालकांना उपलब्ध क्रीडा सुविधा, महत्व, मुलांनी क्रीडाक्षेत्रात करिअर करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी यांसारखे माहितीपूर्ण प्रश्न विचारले.
अधिकारी नाईक यांनी या प्रश्नांची संयमी, प्रोत्साहनात्मक आणि मार्गदर्शक पद्धतीने उत्तरे देत मुलांना क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहण्याचा संदेश दिला.

रेडिओ मनभवनच्या या उपक्रमात ए.टी.झांबरे शाळेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि सर्जनशील विषयांवर आधारित विविध कार्यक्रम सादर केले. गाणी, कथा, लघुनाट्य, प्रेरणादायी संदेश आणि बालदिनावरील विचार यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे व्योम चांदोरकर आणि रेवा चांदोरकर यांनी सादर केलेल्या सुंदर कविता.

मुलांसाठी प्रेरक व्यासपीठ ठरला उपक्रम.

रेडिओ मनभवन तर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम मुलांना रेडिओच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळवून देणारा ठरला.
यामुळे मुलांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास, संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली.
शैक्षणिक पलीकडे जाऊन मुलांनी वास्तविक माध्यमात काम करण्याचा अनुभव घेतला, ही या उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली.

रेडिओ मनभावनने यापूर्वीही विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जपली आहे. बालदिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम त्या परंपरेचा आणखी एक सुंदर भाग ठरला आहे.
‘Always Heart Touching’ या ब्रीदवाक्याला साजेसा ठरलेला हा कार्यक्रम मुलांसाठी अविस्मरणीय अनुभव बनला.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.