जळगाव –
केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एमबीए विभागात “How to Solve Case Study” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून सुप्रसिद्ध शैक्षणिक तज्ञ डॉ. शुभदा मोहन कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या सुरुवातीला एमबीए पहिल्या वर्षाचा विद्यार्थी श्री. सारंग पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना केस स्टडी विश्लेषणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि या उपक्रमासाठी एमबीए विभागाचे अभिनंदन केले. संसाधन व्यक्ती डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केस स्टडी सोडविण्याची पद्धत, विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन केले. सत्र अतिशय प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरले. या कार्यशाळेचे समन्वयन एमबीए विभागप्रमुख प्रा. शेफाली एम. अग्रवाल यांनी केले. विभागप्रमुख प्रा. डिगंबर बी. सोनवणे, डॉ. वीणा पी. भोसले, प्रा. श्रुतिका ए. घरडे यांनी सत्राच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच प्रा. गणेश पाटील , प्रा. हेमंत धनंधरे, प्रा. सुनील विसपुते, , प्रा. कोमल जैन, प्रा. तन्या भाटिया, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा. रेवती पाटील, प्रा. पूर्वजा भोळे, प्रा. विजय जोशी आणि प्रा. यश चौधरी हेही कार्यशाळेदरम्यान उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
