
जळगाव – खान्देशातील शास्त्रीय संगीत साधकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेले खान्देश म्युझिक सर्कलचे सलग सहावे संगीत संमेलन यावर्षीही उत्साहात संपन्न झाले.के.सी.ई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांच्या विशेष सहकार्याने हे संमेलन दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ (शनिवार आणि रविवार) रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात खान्देशातील संगीत क्षेत्रातील गायक आणि वादक अशा एकूण २५ संगीत साधकांनी एकत्र येऊन आपली कला सादर केली. सर्व कलाकारांनी उत्तम गायन, वादन केलेच पण त्या बरोबर अभ्यासात्मक, सांस्कृतिक आणि सांगीतिक विचारांची देवाणघेवाण देखील केली. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला के.सी.ई सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, कान्ह ललित कला केंद्राचे सांस्कृतिक संचालक श्री. शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, श्री. दुष्यंत जोशी, श्री. मोहन रावतोळे, श्री. निळकंठ कासार, प्रा. श्रीपाद शिरवळकर आणि प्रा. देवेंद्र गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. हे संगीत संमेलन एकूण चार सत्रांमध्ये घेण्यात आले, ज्यात कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले: पहिला दिवस (१ नोव्हेंबर २०२५, शनिवार) सकाळचे पहिले सत्र: श्री. जितेश मराठे (भुसावळ) चि. आयुष संदानशिव (अमळनेर) श्री. प्रदीप कोळी (चोपडा) श्री. प्रवीण महाजन (जळगाव) श्री. शिरीष जोशी (भुसावळ) दुपारचे दुसरे सत्र: श्री. भुषण गुरव (जळगाव) कु. ईशा भावसार (पुणे) श्री. हरीश भावसार (पुणे) श्री. चार्वाक जगताप (मुंबई) प्रा. ऐश्वर्या परदेशी (जळगाव) श्री. आशिष राणे (मुंबई) दुसरा दिवस (२ नोव्हेंबर २०२५, रविवार) सकाळचे पहिले सत्र: श्री. राहुल कासार (जळगाव) श्री. महेंद्र सूर्यवंशी (भुसावळ) कु. तेजल जगताप (वडोदरा) श्री. अनिल भालेराव (भुसावळ) श्री. तेजस मराठे (भुसावळ) सौ. श्रुती जोशी (जळगाव) दुपारचे दुसरे सत्र: प्रा. देवेंद्र गुरव (जळगाव) आणि त्यांचे शिष्य (भुषण काटोले, रोहन पाटील, स्वानंद आग्रे, जळगाव) चि. यज्ञेश जेऊरकर (जळगाव) श्री. सचिन जगताप (वडोदरा) प्रा. श्रीपाद शिरवळकर (पुणे) श्री. योगेश संदानशिव (अमळनेर) सौ. गुंजन जगताप (वडोदरा) या संगीत संमेलनासाठी आदरणीय श्री. शशिकांत वडोदकर, श्री. योगेश संदानशिव, श्री. आशिष राणे, श्री. हरीश भावसार आणि श्री. शिरीष जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संमेलनाच्या समारोप प्रसंगी के.सी.ई सोसायटी कान्ह ललित कला केंद्राचे संचालक श्री. शशिकांत वडोदकर यांनी सर्व कलावंतांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कौतुक केले आणि संमेलन यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशातील कलाकारांना प्रोत्साहन आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी प्रेरणा देणारे हे संमेलन संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी ठरले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
