Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»डॉ. सुभाष तळेले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
बातम्या

डॉ. सुभाष तळेले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 30, 2025No Comments373 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील वरिष्ठ लघुलेखक डॉ. सुभाष रूपचंद तळेले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी ‘जनसंवाद आणि पत्रकरिता’ या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. त्यांनी प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय – “मराठी वृत्तपत्रांनी योगविषयक केलेली जागरूकता व त्याचा जनमानसावरील परिणाम: चिकीत्सक अध्ययन” (विशेष संदर्भ: जळगाव जिल्ह्यातील दैनिक दिव्य मराठी, लोकमत व सकाळ) असा होता. या संशोधनात जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांमधून योगाबाबत जनजागृती कशी घडते आणि त्याचा समाजाच्या विविध घटकांवर आरोग्यविषयक व सामाजिक वर्तनावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनातून योगशास्त्रासारख्या प्राचीन व आरोग्यदायी विषयाचे महत्त्व मराठी माध्यमांनी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवले आहे. विशेषतः कोविड–१९ महामारीच्या काळात मराठी वृत्तपत्रांनी श्वसनविकारांचे प्रतिबंध, रोगप्रतिकारशक्ती वृद्धीचे उपाय आणि मानसिक स्थैर्य राखण्याच्या तंत्रांची माहिती देत लोकांमध्ये योगाविषयीची जागरूकता वाढवली. या माध्यमातून प्रेरित होऊन अनेक वाचकांनी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आणि आरोग्यात लक्षणीय सुधारणा अनुभवली. तसेच या संशोधनात माध्यमांची सामाजिक जबाबदारी, लोकांच्या आरोग्यविषयक जाणिवा आणि त्यातून निर्माण होणारा सकारात्मक बदल यांचा सखोल अभ्यास झाला आहे. वृत्तपत्रे केवळ बातम्यांचे साधन न राहता समाजमन घडविणारी आणि आरोग्यविषयक दृष्टिकोन बदलणारी प्रभावी साधने ठरतात, हे निष्कर्षातून अधोरेखित झाले आहे. योगशास्त्राचा ऐतिहासिक प्रवास, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आणि त्यावरील मराठी वृत्तपत्रांतून झालेली जनजागृती यांचा तुलनात्मक आढावा या अभ्यासात घेण्यात आला. कोविड काळात या वृत्तपत्रांनी योगाच्या वैज्ञानिक व मानसिक पैलूंवर विशेष भर दिल्याने लोकांच्या आरोग्यदृष्टीत सकारात्मक परिवर्तन झाले. जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांनी सातत्याने योगविषयक माहिती प्रसिद्ध करून समाजजागृतीत मोलाचा वाटा उचलला आहे. विविध वयोगटांतील वाचकांनी या माहितीचा उपयोग करून आरोग्यविषयक सवयी आत्मसात केल्या व योगाभ्यासातून आरोग्य सुधारले. कोविडच्या आव्हानात्मक काळात या वृत्तपत्रांनी दिलेली मार्गदर्शक माहिती मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी आधारभूत ठरली. एकंदर मराठी वृत्तपत्रे केवळ माहिती पुरवणारे माध्यम नसून आरोग्यविषयक प्रबोधन, प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तन घडविणारी एक प्रभावी माध्यमव्यवस्था आहेत. डॉ. सुभाष तळेले यांनी यापूर्वी दैनिक सकाळ या प्रतिष्ठित वृत्तपत्रात पुणे, नाशिक व जळगाव येथे तब्बल १० वर्षे कार्य केलेले आहे. त्यानंतर गेली २० वर्षे ते मू.जे. महाविद्यालयातील प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासन, माध्यम क्षेत्र आणि योग या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. त्यांच्या या विशेष यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, तसेच के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य, अधिष्ठाता व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनीं यांनी कौतुक करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या शैक्षणिक यशामुळे के.सी.ई.सोसायटी संचालित मू.जे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 2026110

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.